
सर्व स्वामी भक्तांना महाराजांची महती किंवा किर्ती किती अपरंपार आहे याची जाणीव आहेच. स्वामी भक्तीचा अनुभव घेतलेले अनेक पाईक असून ते सतत समाजपयोगी काम करत असतात. अन्नदान, रक्तदान या प्रकारच्या शिबिरात स्वामी भक्त सढळ हस्ते मदत करत असतात. स्वामी भक्ती करण्याची महत्वाची पध्दत म्हणजे ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप होय. मित्रांनो आज हा जप करण्याचा एक विधी पाहू. आणि त्याचे फायदे वाचू.
‘कर्पूर हवन’ अस या विधीच नाव असून करायला अत्यंत सोपा असणारा हा विधी प्रभावशाली आहे. या विधीसाठी एक नारळ आणि कापराच्या ७ वड्या घ्यायच्या आहेत. नारळ शेंडी काढून सोलून घ्यावा. ही शेंडी देवघरासमोर पाटावर ठेवावी. आता या नारळाच्या मध्यावर सुरुवातीला कापराची १ वडी ठेवा ती प्रज्वलित करा. वडी प्रज्वलित होताच ती जळून संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ असा निरंतर जप करा. पहिली वडी संपत आली की, त्या जागी दुसरी वडी प्रज्वलित करा व जप सुरू ठेवा. अशाप्रकारे ७ वड्या आपल्याला प्रजावलित करायच्या आहेत. कापराची ज्योत विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे व जप चालू ठेवायचा आहे. मित्रांनो हा विधी दररोज सकाळी पुजा संपन्न झाल्यावर किंवा संध्याकाळी दिवे लावल्यावर तुम्ही करू शकता. या विधीचे सकारात्मक गुण पाहू.
१) घरात सातत्याने कटकटी होत असल्यास, लोक एकमेकांशी प्रेमाने वागत नसल्यास हा विधी करावा. घरात सकारात्मक ऊर्जा वाढून प्रेम वाढते.
२) घरात सुख, शांती नांदते.
३) जपाने मनोधैर्य वाढून नैराश्य जाते व मन स्थिर होते.
४) एखाद्या उत्तर न मिळालेल्या समस्येचे स्वामी कृपेने उत्तर मिळते.
५) निर्णय घेण्यास मदत होते.
मित्रांनो हा उपाय तुम्ही दररोज करू शकता. फक्त प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येला नारळ बदलायचा आहे. प्रज्वलित नारळ फोडायचा आहे. नारळ खराब निघाल्यास वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा किंवा पिंपळ, वडाच्या झाडाखाली ठेवायचा. चांगला निघाल्यास प्रसाद करून खायचा आहे.
मित्रांनो लेख आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा. लेख इतर स्वामी भक्तात शेअर करा.