मामापासून वाचवा, आमच्या सोबत “ऑनर किलिंग” होऊ शकते : प्रेम विवाहानंतर भाजप आमदाराच्या भाचीचा व्हिडिओ!

0

“युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं” असे फक्त बोलले जाते मात्र प्रत्यक्षात निभावण्याची वेळ येते त्यावेळी मात्र सगळं काही अवघड असते. याचा अनुभव उत्तर प्रदेशमधील एका नवविवाहित प्रेमीयुगुलांना आला आहे. त्यांनी एक व्हिडिओ करत आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील भाजप आमदाराच्या भाचीने लग्नाच्या एक दिवस आधी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले आहे.

व्हिडिओ मध्ये तिने सांगितले की हा धोका आपल्या आमदार मामा व भावापासून आहे. असा व्हिडिओ या दोघा पती-पत्नीने समाज माध्यमांमधून जारी केला आहे. आमदार लाल बहादूर असे या भाजप आमदाराचे नाव आहे.या आमदार महोदयांच्या भाचीचे लग्न 24 मे रोजी होणार होते. मात्र हे मान्य नसणाऱ्या भाचीने एक दिवस अगोदर घरातून आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले. कानपूरच्या आर्य समाज मंदिरात २८ मे रोजी लग्न केले.

आमच्यासोबत ऑनर किलिंग होऊ शकते त्यामुळे आम्हाला सुरक्षा देण्यात यावी अशी विनवणी त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लग्नानंतर मुलाच्या कुुटु्ंबीयांवर पोलिसांनी दबाव टाकला आहे. तसेच प्रेमीयुगल घरी असता त्यांना पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्याचठिकाणी या दोघांनी हा व्हिडीओ बनवला आहे आणि आमचा जीव वाचवा, आम्हाला सुरक्षा द्या असे आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र भाजप आमदार लाल बहादुर यांनी मात्र या प्रकरणात हात वर करत कल्पना नसल्याचे सांगितले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.