….आणि संजय दत्त अचानक मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला नागपूरच्या घरी

0

कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरीही नात्यांना जपावे लागते. भेटी गाठी, सण समारंभ याला गेल्याच्या नंतर अजून नात्यांना बहर येतो हे निश्चित आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी संजयने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली.

राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत हे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह बंधनात अडकले. आयोजित स्वागत समारंभ कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळेस कुणालाही लग्नाला उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते. या कारणामुळे प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त राउत यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित न राहू शकल्यामुळे संजय दत्त याने ही सस्नेह भेट घेतल्याचे माहिती समोर आली आहे.

या वेळी संजय दत्त याने कुणाल आणि आणि त्यांची पत्नी आकांक्षा यांना विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. या वेळी सर्वांशी मनमोकळा संवाद झाला आहे. मात्र या भेटीची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. तसेही दत्त कुटुंबाचे आणि काँग्रेसचे नाते हे जुने आहे. संजय दत्त याची बहीण काँग्रेस पक्षाकडून खासदार होती.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.