
दिल्ली घडामोडीनंतर संजय राऊत – शरद पवार यांची भेट, महाआघाडीच्या भवितव्याबाबत केले हे ट्विट
देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ सध्या होताना दिसून येत आहे. कालचा दिल्लीतील दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. शरद पवारांच्या घरी राष्ट्र मंच नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या नंतर शरद पवारांची कसलीही या बाबत प्रतिक्रिया आली नाही त्यामुळं सगळीकडेच उस्तुक्ता ताणली गेली आहे.
आज शिवसेना नेते आणि खा. संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. संजय राऊत ट्विट करत म्हणाले की “मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले”.
अशा आशयाचे त्यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत कसलीही चिंता नसून स्थिर असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच हे सरकार पाच वर्ष टिकेल असे विश्वासाने सांगितले आहे.