‘संजय राऊत रॉकस्टार’; उर्मिला मातोंडकर यांनी केलं कौतुक!

0

सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी 1 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षामधून केली असली तरीसुद्धा थोड्या दिवसांमध्ये काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी केल्याचं समोर आलं होतं. अद्याप राज्यपाल नियुक्त आमदारांचे प्रकरण प्रलंबित आहे.

शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर चांगल्या ऍक्टिव्ह झाले आहेत त्या शिवसंपर्क अभियानाच्या कारणाने चांगल्याच पुण्यातील अभियानामध्ये सामील होत सक्रिय झाल्या आहेत. आजपासून (१२ जुलै) सुरु झालेलं शिवसंपर्क अभियान हे २४ जुलैपर्यंत राज्यभरात राबवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध घडामोडीवरती भाष्य केल आहे. या वेळी टीकाकारांना मातोंडकर यांनी चोख उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या खासदार संजय राऊत अनेक लोकांच्या टीका सहन करून चोरावर मोर होण्यात सक्षम आहेत, त्यामध्ये मी काय बोलू. ही इज रॉकस्टार !,’ अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांचं कौतुक केलंय. यासोबतच, ‘शिवसेनेत नसलेल्या आणि सामना दैनिकाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांनी याबद्दल फारसं बोलू नये,’ असं देखील मातोंडकर म्हणाल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.