“संजय राऊतांना सिझोफ्रेनिया आजार, राऊतांच्या थुंकेगिरीला आता माध्यमांनीच चाप लावणे गरजेचे”

0

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपचे सरकार आज महाराष्ट्राच्या सत्तेत विराजमान झाले आहे. या सरकार विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी काहीतरी दारूगोळा टाकतात. आता माध्यमांना देखील राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेच व्यसन लागले आहेत. राऊत बोलताना आणि दिवसभर वाद होतो हे गणितच. मात्र आता संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी समोर पचापच थुंकायला सुरुवात केलीय. त्यामुळे एका बाजूला सत्ताधारी पक्षाकडून टीका होत असताना महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उत्तर देण्याऐवजी केलेला थुंकण्याचा प्रकार वादात सापडला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली जात असून महाविकास आघाडीत घटकपक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांच्याकडून सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार केल्याने राऊतांच्या कृतीवर टीका होते आहे.

गुरूवारी संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसमोर थुंकण्याचा प्रकार केला. त्यानंतर गुरूवारी घाटकोपर येथील शाखा संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील एक कुटुंब उन्हाळ्यात गारव्यासाठी परदेशात जात असते, अशी टिका उद्धव ठाकरेंवर केली. खासदार डॉ. शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राऊत यांना विचारले असता त्यांनी पुन्हा त्या प्रश्नावर थुंकण्याचा प्रकार केला. या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजपातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच राजकीय वर्तुळातही राऊतांच्या कृतीवर टीका केली जाते आहे..

काही महिन्यांपू्र्वी खासदार डॉ. शिंदे यांनी ठाण्यातील गुंडाना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप करत सनसनाटी निर्माण केली होती. त्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी राऊत यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाल्याची टीका केली होती. तेव्हापासून खासदार राऊत आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. मात्र राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीमुळे त्यांच्यावर टीका होते आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या अशा थुंकेगिरीला आता माध्यमांनीच चाप लावणे गरजेचं आहे. नाहीतर टीआरपीसाठी माध्यमे राऊतांची स्पीटून बनतील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.