सांगलीत “जयंत थाळी” बेघरांच्या साठी ठरतेय माणुसकीचा आधार, राष्ट्रवादी युवक कडून मदतीचा हात!

सांगलीत "जयंत थाळी" बेघरांच्या साठी ठरतेय माणुसकीचा आधार, राष्ट्रवादी युवक कडून मदतीचा हात!

0

सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोणाची रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन केले आहे. अशा काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच भिकारी व बेघरांच्या जेवणाचा सुद्धा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. बेघरांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून माणुसकीचा हात देण्यात आला आहे. लॉकडाऊन मध्ये कित्येक लोकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. अशा काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहे. लोकांना जेवण देण्याचे कार्य युवक काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या नावाने “जयंत थाळी” देण्यात आली आहे. १५ दिवसांपासून ही सेवा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून देण्यात आली आहे. युवक शहर अध्यक्ष बल्लू उर्फ विनायक केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी गेल्या १५ दिवसांपासून जयंत थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण देत आहेत.

१५ दिवसात सुमारे ७ हजार ५०० जयंत थाळी पॅकेट वाटप करण्यात आले आहे. नागरिकांना यामुळे चांगलाच आधार मिळाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.