गिर्यारोहीका कस्तुरी सावेकरला एव्हरेस्ट शिखर मोहीमेसाठी; आ.ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात!

0

महाराष्ट्रातील तरुण आमदारांच्या पैकी एक असणारे काँग्रेस पक्षाचे आ. ऋतुराज पाटील यांनी आपला मदतीचा हात पुढे करत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक असणारी कस्तुरी सावेकर हिला मदत केली आहे.

या बाबतीत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

कस्तुरी सावेकर ही सध्या माऊंट एव्हरेस्ट मोहीमेच्या अंतीम टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी अंदाजे 42 लाख रुपयांचा खर्च असून, ही मोहीम पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन सावेकर कुटूंबियांकडून करण्यात आले होते. कोल्हापुरच्या या रणरागिणीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आज डॉ डी वाय पाटील ग्रुपच्यावतीने एक लाख रुपयांचा धनादेश कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे सुपूर्द करत ही छोटीशी मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही मदत .डी.वाय पाटील ग्रुपच्यावतीने अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील साहेब, पालकमंत्री सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली आहे.

जगातील सर्वोच्च शिखर असणार्या माऊंट एव्हरेस्ट वर भारताचा तिरंगा फडकावत कस्तुरी कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहचवेल असा विश्वास असून कस्तुरीला या मोहिमेसाठी आ. ऋतुराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.