खासदार सासरा आणि कुटुंबापासून जीवाला धोका, रुपालीताई प्लिज मला येथून घेऊन चला…

0

वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याने वर्धा येथील निवासी एका युवतीशी लग्न केल होत, अर्थात या युवतीने पंकज याने लग्नाचा बनाव करून आपल शारीरिक शोषण केल तसेच मारझोड केली अशी तक्रार नागपूर पोलीस महानिरिक्षकांकडे केली आहे.संबंधित युवती आणि पंकज तडस काही दिवस वर्धा येथे राहत होते, परंतु पंकज याने नंतर युवतीचा छळ सुरू केला असे तिच म्हणण असून पंकज आपल्याला ठेवलेली बाई म्हणत होता असही तिन स्पष्ट केल आहे.

 

यासंदर्भात युवतीने खासदार रामदास तडस यांच्या कुटुंबियाविरोधातच नागपूर पोलीस महानिरिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु या युवतीचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून यात ती राष्ट्रवादीच्या नेत्या रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागण असून माझ्या जीवाला धोका आहे, मला मारहाण होत आहे, मला घेऊन चला अशी याचना करताना दिसून येत आहे.

 

यासंदर्भात रूपाली ताई चाकणकर यांनी एक ट्विट करून रामदास तडस यांची सून मदत मागत असून आपण पोलिसांशी संपर्क साधला तसेच राष्ट्रवादीचे वर्धा येथील पदाधिकारी मदतीला पोहोचलेत अशी माहिती दिली.

 

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.