
राफेल घोटाळ्यावरून रुपालीताई चाकणकर यांचा अप्रत्यक्ष टोला!
भारतामध्ये राफेल प्रकरण हे फारच गाजले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये यावरून चांगलेच राजकारण पेटले होते. मात्र या राफेल प्रकरणाला आता जागतिक स्वरूप आले आहे. राफेल घोटाळ्याची चौकशी आता फ्रान्समधील न्यायालयांमध्ये होणार आहे. या चौकशी वरून देशातील आणि राज्यातील नेते भाजपा वरती टीका करून चांगल्या प्रकारे तोंडसुख घेताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणतात की “चौकीदार चोर आहे” हे जर भारतातील न्यायालयाने जाहीर केलं असतं तर त्यांच्या “विश्वगुरु” प्रतिमेला ते शोभलं नसतं. आता फ्रांस मधील न्यायालयाने जाहीर केल्यावर कसं जागतिक दर्जाचा चोर असल्यासारखं वाटेल. प्रतिमेशी तडजोड अजिबात नाही”. अशा आशयाची त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. इतकेच नव्हेत तर खाली लक्षात यावे म्हंणून #RafaleScamDebunk अशा आशयाचा हॅशटॅग सुद्धा त्यांनी दिला आहे.