घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा – रुपाली चाकणकर

0

भारतामध्ये लसीकरनावरून मोठे राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये मोठेपणा मिळवण्यासाठी लसी फुकट वाढताना दिसत आहे. मात्र आपल्या देशांमध्ये लवकरात लवकर नागरिकांना लस द्यावी अशी इच्छा केंद्र सरकारची नाही का ? असा प्रश्न उपस्थित होतो. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी केंद्र सरकार वरती चांगलीच कोटी करत टीका केली आहे.

“घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…
भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल”. अशा आशयाचे ट्विट करत शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

भारतातील मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मृत्यूच्या बाबतीत, रुग्ण संख्येच्या बाबतीत दिवसेंदिवस देशात नवनवीन विक्रम केले जात आहेत. देशातील परिस्थिती आटोक्यात यायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. याच गोष्टीमुळे अजूनही परिस्थिती आटोक्यात यायला तयार नाही. राजकारण सोडून ठाम अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.