दोन बहिणी कशा झाल्या सख्ख्या जावा ‘, पहा संपूर्ण व्हिडीओ !

0

राज्यात सर्वत्र घरोघरी उत्साहात श्री गणेशाच आगमन झाल असून, गणेश प्रतिष्ठापना आणि आरती मोठ्या भक्तीने झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या पूणे येथील निवास स्थानी गणेशाचे उत्साहात आगमन झाल असून रूपालीताईंच्या घरात गणपतीबाप्पापुढे मोहक सजावट करण्यात आली आहे. बैलगाडी शर्यत अशाप्रकारचा प्रतिकात्मक सुंदर देखावा गणेशापुढे करण्यात आला आहे. दरम्यान रूपालीताई यांच्या घरची आरती पार पडल्यावर त्यांची व त्यांच्या बहिणीची मुलाखत घेण्यात आली, त्यात रूपालीताईंना कौटुंबिक, राजकीय जीवनाबाबत मनमोकळा संवाद साधला.

रूपालीताईंनी सांगितल, त्यांची मोठी बहीणच त्यांची मोठी जाऊ आहे. त्यावर टाकलेल्या हे घडल कस? या मिश्कीलीवर रूपालीताईंची बहीण उत्तरली रूपालीच हे अरेंज मॅरेजच आहे. रूपालीताई म्हणाल्या, माझ्या व्यस्त कार्यक्रमातून मला सगळीकडे उपस्थित राहता येत नाही परंतु, माझी बहीण माझी ढाल बनून सगळीकडे उपस्थित असते. माझ्या मुलाला सोहमलाही ती छान सांभाळते.माझी बहीण माझी आणि माझ्या मुलाच्या आईची जबाबदारी निभावते.आमच्या आईच छत्र आमच्यावरून लवकर हरपल परंतु माझी बहीणच जाऊ, बहीण आणि आई अशी भूमिका निभावते.आमचे वडील आमच्यासोबतच राहत असून त्यांचा आधार वाटतो अस त्या म्हणाल्या.

गणेशोत्सवाची लहानपणीची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, आमच ८० ते ८५ जणांच एकत्र कुटुंब होत.आम्ही सगळी लहान भावंड एकाच वयाची होतो, तेव्हा पुण्यातील गणपती बघायला जाण हा मोठा उत्सुकतेचा विषय होता. आम्ही काकांसोबत सगळी भावंड बाहेर पडायचो आणि रस्त्यात भेळ दिसेल तीथ भेळ खाण, पाणीपुरी खाण असही करत होतो. रूपालीताईंच्या आजारपणाबद्दल विचारल असता, सगळ्यां पाठबळ, शुभेच्छा, प्रारब्ध यामुळेच आपण यातून बाहेर पडलो अस त्या म्हणाल्या.रूपालीताईंच्या बहिणीने म्हणजेच जावेने त्यांच कौतुक करताना सांगितल, ती अतिशय धाडसी असून योग्य निर्णय घेते. शेवटी रूपालीताईंनी गणेशाला विनवणारा उखाणा घेतला. ” गणपती बाप्पाचे आगमन झाले करू त्याची आराधना कोरोनाचे विघ्न दूर होवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना”.

Leave A Reply

Your email address will not be published.