नरेंद्र मोदींच्या अपयशावर रुपाली चाकणकर यांची टीका!

0

केंद्र सरकार कोणताही निर्णय घेतला की काम होण्याच्या अगोदर कोट्यवधी रुपयांची जाहिरात करते. जाहिरातींचा एका दिवसाला तब्बल दोन कोटी रुपये केंद्र सरकारने २०१९-२०२० या वर्षात खर्च केले असल्याचे माहिती माहिती अधिकारातून मिळाली होती. इलेक्ट्रॉनिक मीडिया, जाहिराती, होर्डिंग्ज, वृत्तपत्र या या वर तब्बल ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च केले आहेत.

याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सध्या समाज माध्यमे, इतर गोष्टी मधून लोकांवर सिस्टीम चा कसा दोष आहे हे बिंबवण्याचे काम केले जात आहे. याच गोष्टीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

त्या म्हणाल्या “जसं ग्रामीण भागातील बायका डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेत नाहीत तसंच मीडियावाले सुद्धा डायरेक्ट मोदींच नाव न घेता त्यांना ‘सिस्टिम’ म्हणतात”. अशा शेलक्या शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.