शरद पवारांनी विचारलेला ‘तो’ प्रश्न आणि कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय; रोहित पवारांचा खुलासा.

0

ज्येष्ठ नेते शरद पवारांना दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून देशभरात ओळखले जाते. त्यांचा अभ्यास, त्यांचे असणारे निर्णय घेण्याचे कौशल्य हे फार मोठे आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अा.रोहित पवार यांना संधी दिली होती; या संधीचे सोने त्यांनी करून दाखवले. ही संधी देण्याच्या अगोदर शरद पवार आणि रोहित पवार यांच्या मध्ये संवाद झाला होता. मूलभूत कामे करत त्यांनी मतदारसंघ चांगलाच बांधत आणला आहे. कर्जत जामखेड सातत्याने कामाच्या बाबतीत चर्चेत असते.

रोहित पवार यांना लोकसत्ता ने घेतलेल्या मुलाखती मध्ये विचारण्यात आले होते की शरद पवार यांनी दूरदृष्टीने विचार करुन रोहित पवार यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे का?

या प्रश्नाला उत्तर देताना रोहित यांनी मतदारसंघ निवडण्यापूर्वी झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. “निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा विचार केला जात होता. तेव्हा नक्की कुठून निवडणूक लढवायची याची चर्चा सुरु होती. त्यावेळी मला शरद पवार यांनी विचारलं की, “सोपा मतदारसंघ विचार करत असशील तर असे अनेक मतदारसंघ असू शकतात की ज्या ठिकाणी तू निवडून येऊ शकतो. पण तुला एकदाच आमदार व्हायचं आहे की तुला सातत्याने त्या ठिकाणी काम करुन, चांगलं काम करुन, लोकांचं प्रेम मिळवून तिथून सातत्याने आमदार म्हणून निवडून येत एक वेगळं मॉडेल निर्माण करायचं आहे का?”


चांगले काम करण्यासाठी मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी उभे राहावे. जेणेकरून चांगल्या प्रकारे काम करून दाखवता येईल. लोकांचे जीवनमान उंचावण्यास संधी मिळेल या दृष्टिकोनातून विचार करून कर्जत-जामखेड या मतदारसंघाची निवड केली असे रोहित पवार भाषणातून सांगत असतात. “ज्याचा सर्वासामान्य लोकांना फायदा होईल असं ठिकाण निवडायचं म्हणून मी कर्जत-जामखेड ठिकाण निवडलं. तिथं लोकं प्रेमळ आहेत पण विकास हा कधीच झाला नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.