रोहित पवारांनी ट्विट करत केले राज्यातील जनतेला आवाहन

0

मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६० हजारांवर गेली असून, त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.

ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

तसेच राज्यातील पोलीस प्रशासनाला, कडक निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.

मात्र या निर्बंधाचा अनेकांना त्रास झालेला दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राज्यात करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. हीच परिस्थिती अन्य राज्यांमध्ये देखील असून, तिथेही त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत, “राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण आज प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्यानं नाईलाजानं हा निर्णय घेतला आहे. अन्य राज्यांतही असाच निर्णय घेतला जाईल, अशी स्थिती आहे हे ध्यानात घ्यावं. या काळात एकमेकांना सहकार्य करुयात, करोना विषाणूची साखळी तोडूयात,” असं आवाहन केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.