रोहित पवारांनी सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघात उभारले ३०० बेडचे कोविड सेंटर!

0

रोहित पवार यांनी अहमदनगर दक्षिण मध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार जबरदस्त काम करत आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्याचा पूर्ण ताण हा जिल्हा रूग्णालया वर पडत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आ.रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून येथील पोलिस परेड ग्राऊंडवर ३०० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले.

आपला मतदारसंघ मजबूत करून मग त्यांनी अहमदनगर दक्षिण मध्ये “साखर पेरणी सुरू केली” अशी लोकांत चांगलीच चर्चा सुरू आहे. अहमदनगर दक्षिण हा खा. सुजय विखे यांचा मतदार संघ आहे. मात्र सध्या ते इंजेक्शन च्या प्रकरणावरून चांगलेच अडचणीत आले आहेत. मात्र रोहित पवार यांनी लोकांची अडचण लक्षात घेत मजबूत अशी पायाभरणी या माध्यमातून सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कामाच्या बाबतीत रोहित पवार उभ्या महाराष्ट्रात सक्रिय असतात. त्यांना पूर्ण महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.