‘५ वर्षे जनतेने सत्ता दिली, याची तरी जाणीव ठेवा’

0

मुंबई : रेमेडीसिवीरचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक्स फार्मा कंपनीच्या मालकाला, मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी, ‘ज्या जनतेने ५ वर्षे राज्याची सत्ता विश्वासाने हाती दिली होती, त्याची जाणीव ठेवून राज्याची अडवणूक न करता, आवश्यक ती औषधं केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपने राज्याला उपलब्ध करून द्यावीत. मग नेहमीप्रमाणे त्यांनी याची जाहिरात करून राजकीय भांडवल केलं तरी हरकत नाही, असे ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

त्यांनी लिहिले आहे की, आजपर्यंत जनतेच्या कल्याणासाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याने पाहिले; पण आज महाराष्ट्राची जनता अडचणीत असताना, या जनतेच्या कल्याणासाठी भांडण्याऐवजी काळाबाजार करणाऱ्या कंपनीसाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याला पहायला मिळतायेत, हे खेदजनक आहे, अशा शब्दात उघडपणे रोहित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच रोहित पवार म्हणाले की, करोना संपल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला तुम्ही मोकळे आहातच, पण आजही तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. आम्ही मात्र लोकांचे जीव वाचवण्याचा आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करतच राहू.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.