रोहित पवारांनी रुग्णालयातच साजरा केला आरोग्यदुताचा वाढदिवस!

0

सध्या सगळीकडे अंधार दिसत असताना आपल्या सेवेच्या माध्यमातून लोकांना आशेचा किरण जर कुठे दिसत असेल तर तो डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्या कडे पाहून दिसत आहे. सध्या अहोरात्र कष्ट करत माणसांना जीवनदान देण्याचे काम हे आरोग्यदुत करत आहेत. त्यांच्या या सेवेचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. इतक्या बिकट परिस्थिती मध्ये आपल्या सेवेशी, आपल्या कार्याशी जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांचा सर्वांना आदर वाटावा असा हा क्षण आहे.

अहमदनगर येथे रुग्णालयाला भेट देण्यासाठी व आरोग्य सेवेच्या बाबतीत आढावा घेण्याच्या दृष्टीने आ. रोहित पवार गेले असता एका नर्स चा वाढदिवस असल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्यांना तत्काळ शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सोबत रुग्णालयात केक कापून वाढदिवस साजरा केला. आरोग्यसेवेचा कणा म्हणजे नर्स. सध्या कामाच्या ताणामुळे त्यांना जेवायलाही वेळ नाही. त्यांची अहोरात्र घेतलेली मेहनत ही लोकांना. जीवनदान देण्याचे काम करत आहे. त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याची गरज आहे. हाच सन्मान अनमोल क्षणी आ. रोहित पवार यांनी केला हे अविस्मरणीय क्षण आहे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.