सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रोहिणी खडसेंचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश: उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला नवे बळ!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उत्तर महाराष्ट्रात महिला नेतृत्व मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी एका नवीन राजकीय वाटचालीस सुरुवात केली आहे. त्या राजकारणात फारच सक्रिय असून त्या भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणार आहेत.

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या “मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे

मागील काही दिवसांपूर्वी रोहिनी खडसे यांनी सोशल मीडिया वरती मनगटावर घड्याळ दाखवत आपला एक फोटो शेअर केला होता यावरूनच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा लक्षात येत होती त्यांनी आता निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आता त्यांच्या पुढील राजकीय काम पहाणे नक्कीच महत्त्वाचे ठरेल.

काही दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नवा फोटो शेअर केला होता. यामध्ये त्या मनगटावरील घड्याळाकडे बघताना दिसतात. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो ठेवत त्यांनी एकप्रकारे आपली पुढील राजकीय वाटचालच सांगितली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.