ऋषी कपूरला मरेपर्यंत होता या गोष्टीचा पश्चाताप

0

ऋषी कपूर नेहमीच त्यांचा बोल्ड स्वभावामुळे चर्चेत राहिले आहेत. ऋषी कपूरनी कधीही त्यांचा स्वभाव लावला नाही. ते अगदी त्यांना वाटेल त्या विषयावर सोशल मिडीयावर परखड मत मांडायचे. मेरा नाम जोकर चित्रपटात शालेय मुलग्याची भूमिका करणार्या त्रषी कपूरनी बॉबी चित्रपटापासून हिरो म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. ऋषी कपूर यांचे अनेक चित्रपट गाजले पैकी चांदनी, दिवाना, बोल राधा बोल इ चित्रपट मैलाचा दगड ठरले. ऋषी कपूर यांचे नुकतेच कॅन्सरने निधन झाले, मरेपर्यंत त्यांना या गोष्टीचा मलाल होता.

ऋषी कपूर यांना मुलगा रणबीर कपूर याच्याबरोबर असणारे त्यांचे संबंध याबाबत मलाल होता. ते म्हणत मी प्रयत्न करत असून माझी पत्नीही याबाबत साथ देत असते परंतु आमचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी होत नाही आहेत. आमच्या दोघांच्यामध्ये काचेच्या भींतीसारखे काहीतरी असून आम्ही त्यातून एकमेकांना बघू शकतो परंतु संवाद साधता येत नाही आहे.

एका प्रसिध्द मानसशास्त्रज्ञाच्या मतानुसार मुलाच्या मानसिक, भावनिक, लैंगिक विकासात वडिलांची भूमिका महत्वाची असते. ऋषी कपूर सातत्याने रणबीरसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले असून मृत्यूपूर्वी त्यांनी हा मलाल व्यक्त केला होता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.