ओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत

0

बहुतांश स्त्रियांना ओठाच्या वरती बारीक मिशीप्रमाणे केस असण्याची समस्या असते.हे केस वारंवार पार्लरमध्ये जाऊन काढावे लागतात. असे केस सौंदर्यात बाधा आणतात. भारतीय परंपरेत बाळाला बेसन पीठ लावून चोळून अंघोळ घातली जाते. यामुळे बाळाच्या अंगावरील केस जातात व रंगही उजळतो. आज आपण असाच एक परंपरागत उपाय ओठांवरचे केस घालवण्यासाठी वापरणार आहोत ज्याने तुमची समस्या मुळापासून संपेल.

साहित्य :
१) साखर – १ चमचा
२) बेसन पीठ – अर्धा चमचा
३) हळद – पाव चमचा
कृती :
साखर एक चमचा त्यात बेसन पीठ एक चमचा तसेच पाव चमचा हळद एका वाटीत घेऊन मिसळून घ्या आता एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवा ते उकळू लागताच त्यात मिश्रणाची वाटी ठेवा व मिश्रण मिक्स करा.मिश्रणात १ चमचा पाणी घाला आणि मिश्रणातील साखर वितळून घ्या. मिश्रण चिकट व दाट असल पाहिजे. साधारण ४ ते ५ मिनिटात हे मिश्रण काढू घ्या व ही पेस्ट कोमट असतानाच ओठाला लावा हा लेप दाटसर लावा. दहा मिनिटे हे मिश्रण ठेवा व नंतर हा लेप रब करून काढा.रब करताना केस मुळापासून तुटत येतात ते तुटल्यावरच रब करण थांबवा व नंतर थंड पाण्याने धुवा.

हा उपाय आठवड्यातून दोनदा करा तुमचे केस हळूहळू निघून जातील व नंतर ते मुळापासून वाढायचे बंद होतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.