केस घनदाट, लांबसडक वाढवण्याचा उपाय

0

केस गळणे, केसाला फूट फुटणे, कोंडा होणे अशा समस्या असल्यास केसवाढीवर तसेच त्याच्या घनदाटपणावर परिणाम होतो. घनदाट, लांबसडक केस सौंदर्यात भर घालतात. आंबाडा किंवा लांब वेणी घालण्यासाठी घनदाट व लांब केसांची जरुरत असते. असे घनदाट व लांब केस वाढवण्यासाठी एक घरगुती उपाय आपण आज बघणार आहोत.

साहित्य :
१) चहापूड – २ चमचे
२) शाम्पू – २ चमचे
कृती :
सर्वप्रथम पातेल गॅसवर ठेवून त्यात २ ग्लास पाणी घाला त्यात १ चमचा चहापूड घाला. आता पाणी उकळा. किमान ३ ते ४ मिनिटे पाणी उकळा. आता गॅस बंद करा व चहाचे पाणी खाली काढून गार करा. आता हे पाणी गाळून घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबूरस घाला. मिक्स करून घ्या. या मिश्रणाचा लेप तयार करा व केसांना त्याचा मसाज करा. आता केस धुवून टाका. आठवड्यातून साधारण दोनदा हा उपाय करा.

साधारण महिनाभरात केस गळती, कोंडा, केसांना फूट पडणे या समस्या दूर होऊन केस वाढीला लागून घनदाट होतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.