नुकतच या दोन अभिनेत्यांनी स्वताच दुसर लग्न पाडल पार

0

चंदेरी दुनियेत पडद्यावर प्रेम रंगवणारे नायक वास्तव आयुष्यातही प्रेमाचे रंग उधळताना दिसतात. काहीजण याच रुपांतर विवाहात करतात तर काहीजण ब्रेक अप करतात. आत्ता मात्र आपण अशा दोन नायकांची चर्चा करणार आहोत ज्यांनी प्रेम करून लग्न तर केलच पण लगेचच घटस्फोट घेत दुसर लग्नही उरकल आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या पूर्व पत्नीही अभिनेत्री होत्या. हा ! आता त्यांचे संसार मोडलेत आणि हे अभिनेते दुसर्या अभिनेत्रीशी विवाहबध्द झालेत.

दुसर लग्न करणारा पहिला अभिनेता आहे विजय आंदळकर, या अभिनेत्याने पुजा पुरंदरे या अभिनेत्रीशी २०१७ साली विवाह केला होता. परंतु हा विवाह अवघा ४ वर्षे टिकला असून विजय आंदळकरने घटस्फोट घेत अभिनेत्री रूपाली झनकरशी एप्रिलमध्ये साखरपुडा उरकला आहे. लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत. विजय आणि रूपाली झनकर या दोघांनी लग्नाची वाईफ वेडींगची बायको या मालिकेत नवरा बायकोची भूमिका निभावली होती. मालिकेचे शूटींग नाशिकमध्ये पार पडले. शूटींगदरम्यानच दोघांत जवळीकता वाढली व दोघांनी साखरपुडा उरकला आहे. पुजा पुरंदरे सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम करत असून तिने आपल्या एक्स हसबंडच्या साखरपुड्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसरा अभिनेता आहे संग्राम समेळ, या अभिनेत्याने २०१६ साली अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी लग्न केले होते पण हे लग्न ५ वर्षे टिकले असून संग्राम समेळने घटस्फोट घेत अभिनेत्री श्रध्दा फाटक हिच्याशी दुसर लग्न केलेल आहे. अभिनेता संग्राम समेळने पुढच पाऊल, ललित २०५, कुसुम मनोहर लेले, अशा मालिकांत अभिनय केला आहे. या दोघा अभिनेत्यांनी नवे मांडलेले संसार यशस्वी होवोत इतकीच प्रेक्षकांची अपेक्षा.
प्राईम महाराष्ट्र टिमकडून या दोन्ही अभिनेत्यांना शुभेच्छा. मित्रांनो लेख आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा. लेख शेअर जरूर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.