ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार, भुजबळांची प्रतिक्रिया, मु्ख्यमंत्री आणि शरद पवार प्रयत्नशील!

0

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. आज महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की “ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला मी तयार आहे” असे ते म्हणाले.ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणप्रश्नी एकत्रितपणे बसून चर्चा करणं गरजेचं असल्याचं सांगत त्यांनी आज याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.या नंतर बोलत असताना ते म्हणाले की “राजकारण आपल्या स्थानी, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वांनी एकत्र या. ओबीसी आरक्षणासंदर्भात तोडगा निघणं महत्वाचं आहे. त्यासाठी सामुहिक नेतृत्व करु, असं आवाहनही भुजबळ यांनी सर्व विरोधकांना केलंय”. येत्या 2 ते 3 दिवसांत इम्पेरिकल डाटासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.