
दर्यादिल केनियाची थट्टा करण्या अगोदर हे वाचा !
जगातील श्रीमंत देश म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे अमेरिका तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला 9/11 चा हल्ला भयंकर होता. तीन हजार पेक्षा जास्त लोकांचा या मध्ये मृत्यू झाला होता. जगातील बहुतांश देशांनी या वेळी अमेरिकेला मदत पाठवली होती.
काही दिवसांनी या हल्ल्याची माहिती केनियातील मसाई या आदिवासी समूहात पोहोचली. तेंव्हा तिथल्या मसाई आदीवाशांनी अमेरिकेला मदत करण्याचे ठरवलं. ही मदत त्यांनी अमेरिकेच्या दुतावासाकडे देऊ केली. मदत काय होती तर 14 गायी. वाटणारी मदत ही फार लहान आहे. पण त्या मागील त्यांची भावना फार मोठी आहे. त्यांना ही बातमी कशी समजली तर स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा त्यांनी मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली. त्या नंतर पत्रव्यवहार झाला आणि त्यांनी ही मदत पाठवली.
भारतातील कोरोनाच्या संकटामुळे मोठी वाईट अवस्था निर्माण झाली आहे. कित्येक लोकांचे प्राण या कालावधीमध्ये गेले आहेत भारताला जगभरातून मदत केली जात आहे. विविध देशांनी भारताला वैद्यकीय मदत केली आहे काही ऑक्सिजन सिलिंडर्स औषधे आदी उपकरणांचा या मध्ये समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे पूर्व अफ्रिकन देश केनिया या देशाने देखील भारताला कोरोना संकटाच्या काळात मदत म्हणून 12 टन खाद्य उत्पादने पाठवली आहेत. गेल्या 28 मेला ही मदत भारतात पोहोचली आहे. मात्र या मदतीची सोशल मीडियावरती थट्टा उडवण्यात आली आहे. गरीब देश, कंगाल देश असा उल्लेख बहुतांश ठिकाणी केला जातो आहे. मात्र केनियाचा मनाचा मोठेपणा हा श्रीमंत देशांपेक्षा नक्कीच मोठा आहे.