व्हायरल होत असलेल्या “सरकारी किट” वर टाकलेल्या नळाच्या पाण्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असलेल्या व्हिडिओ मागील वाचा सत्य!

0

कोरोना टेस्ट करणाऱ्या किट वरती नळाचे पाणी टाकूनही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो आहे. अशा आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. सरकारी यंत्रणा तुम्हाला जिवंतपणी मारणार अशा आशयाचा मेसेज सुद्धा या मध्ये आहे. मात्र या मागील सत्य काय आहे. आपण जाणून घेण्याचं प्रयत्न करणार आहोत.

नाकातील स्वॅब घेतल्या नंतर त्यास विशिष्ट रासायनिक द्रव्यात मिक्स केले जाते. त्याचे केवळ ५ थेंब कीटवर टाकून १५ मिनिटांनी येणारे रीडिंग म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट असते. मात्र व्हिडिओ मध्ये असे काहीही पाळले गेले नाही सरळ पाण्याच्या नळा खाली किट ठेवली आहे. ज्या टेस्ट साठी १५ मिनिटे द्यावे लागतात त्याला फक्त त्यांनी २ मिनिटे दिले आहेत. त्यातूनही समोर दिसत असलेली रीडिंग अस्पष्ट आहे. C समोरील रेषा स्पष्ट दिसत आहे परंतु T समोरील रेषा अर्धवट आणि अस्पष्ट आहे. म्हणजे नियमानुसार C समोरील रेषा स्पष्ट दिसत म्हणजे रिपोर्ट निगेटीव्ह आहे.

आलेला निकाल आपण पॉझिटिव्ह समजला तरीही आपणास हे जाणून घ्यायला हवे की स्वतः अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA हे स्पष्ट करते की एखादा रुग्ण कोव्हीड पॉझिटिव्ह असल्याचे ठोसपणे ठरवण्यासाठी RT-PCR टेस्ट हीच विश्वासार्ह आहे. चेक पोस्ट मराठी यांनी या व्हिडिओ मागील सत्य समोर आणले आहे.

लोकांच्या मनात या व्हिडिओ मुळे चांगलाच गैरसमज निर्माण झाला होता. या माहितीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे लोकांमध्ये जागृती होत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.