रश्मी शुक्ला गृहमंत्र्यांसमोर रडल्या,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक माहिती

0

राज्य गुप्तचर वार्ता विभागाच्या आयुक्त व तत्कालिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या दोन महिन्यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांकड येऊन रडल्या व फोन टॅपिंग प्रकरणी माझ्यावर कारवाई करू नका अशी विनंती करत होत्या.यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोरीही त्यांनी आपली चूक कबूल केली होती.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बहिणीकडून चूक झाली असे समजून मोठ्या मनाने त्यांना माफ केल होत.परंतु दोन महिन्यानंतर विरोधी पक्षांना अहवाल पुरवून विना परवानगी फोन टॅप केल्याच सिध्द झाल आहे.अशा अधिकारयावर सर्व मंत्र्यांनी मिळून एकजूट होऊन कारवाई करण्याचे ठरवले आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला भेटल्या होत्या त्यावेळी त्यांनी म्हटले की,तुम्ही मोबाईलवर संभाषण करू नका,वाॅट्स अॅप करू नका, तसेच लँड लाईनवर फोन करा. मोबाईलवर फोन करू नका.तसेच जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची घाणेरडी सवय आहे.रश्मी शुक्ला यांनी वेगवेगळ्या नावाने अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत.परिणामी त्यांची बदली केली आहे.विना परवानगी फोन टॅपिंगचे प्रकरण गंभीर असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र आहे.असही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हटले.

केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत त्यानुसार राष्ट्रघातक कृत्य,परकीय देशातील आत्मघाती संघटनांशी मैत्री, देशातील शांतता भंग करणारे फोन टॅप करण्याची परवानगी आहे, परंतु रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग करत राईट टू प्रायव्हसीचा भंग केला आहे.परिणामी त्यांच्यावर कारवाई होत गरजेच असल्याच जितेंद्र आव्हाड म्हणाले

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.