आपल्या बेधडक अंदाजाने सगळ्यांना हसवणारा रणवीर मात्र ढसाढसा रडला,कारण वाचून तुमच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतील..!

0

बॉलिवूडचा गली बॉय, नेहमीच आपल्या अतरंगी अंदाजात असणारा अभिनेता रणवीर सिंह त्याच्या कूल अंदाजासाठी ओळखला जातो.यावर्षी रणवीर विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या तो एका टीव्ही शोमध्ये होस्टची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय.

‘द बिग पिक्चर’ या क्विज शोमधून रणवीर होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये रणवीर हा ढसाढसा रडताना दिसत आहे.खरंतर नेहमीच रणवीर खूप जास्त आंनदी असतो पण त्याला रडताना बघून त्याच्या चाहत्यांच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल.

विशेष म्हणजे ‘द बिग पिक्चर’ या शोचा हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणवीर त्याच्या दिलखुलास अंदाजात डान्स करत मंचावर येताना दिसतोय. यानंतर त्याने सुरुवातीला एका स्पर्धकाच स्वागत केलं.

आणि त्या स्पर्धकाने त्याच्या आयुष्यातील संघर्ष सांगितले. वडिलांच्या निधनानंतर तीनही बहिणींनी भावाच्या शिक्षणासाठी त्यांचं शिक्षण सोडल्याचं स्पर्धकाने सांगितलं. त्यामुळे आता बहिणींसाठी काहीतरी करावं आणि त्यांच्या साठी जगावं त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे,अस स्पर्धक म्हणाला.

स्पर्धकाचा हा संघर्ष ऐकून रणवीर मात्र खूप भावूक झाला आणि त्याला अश्रू आवरणं कठीण झालं. यावेळी रणवीर मंचावरच खूप दुःखी होऊन रडू लागल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.त्यांनतर रणवीरने मात्र असं काही केलं की तो स्पर्धक खूप आनंदी झाला.

त्याने व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून त्याच्या परिवाराशी गप्पा केल्या आणि स्पर्धकांच्या आईसोबत आणि बहिणीसोबत मनमोकळं केलं.त्याच्या ह्या भावनिक कृत्याने मात्र प्रेक्षकांची मने कायमची जिंकली.त्याचा हा नवा अंदाज एका टिव्ही शो च्या माध्यमातून पहिल्यांदा च दिसत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.