
रणवीर ची “सीता” चित्रपटात रावण साकारण्याची तयारी!
“सीता” या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ची अलौकिक देसाई यांनी घोषणा केली आहे. या सिनेमामध्ये सीतेच्या सोलसाठी करीना कपूर किंवा आलिया भट यांच्या नावाचा विचार केला जातो आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात रावणाचा रोल मात्र बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंह करणार आहे. त्याने स्वतः हुन रावणाचा रोल करण्याची तयारी दाखवली आहे.
हा चित्रपट बिग बजेट चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा ही सीतेच्या दृष्टिकोनातून रामायणाची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटाचे प्रॉडक्शन ‘बाहुबली’इतके मोठे असणार आहे, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले. रामायणावर आधारित या सिनेमामध्ये व्हीएफएक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असेल.
या रावणाच्या रोल व्यतिरिक्त बहुचर्चित ’83’म्ध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या रोलमध्येही दिसणार आहे. याशिवाय ‘सर्कस’ आणि ‘जयेशभाई जोरदार’मध्येही तो असेल.