रणवीर-दीपिका ची जोडी आता करणार आयपीएल मध्ये धुमाकूळ;तुम्हाला सुद्धा वाचून विश्वास होणार नाही…!

0

नुकताच T-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे,भारताला आता पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत रविवारी खेळवले जाणार आहे.क्रिकेट म्हटलं की आधी नावं येतं खेळाडूंचा आणि अभिनेत्यांचा,खरंतर क्रिकेट आणि चित्रपटाचे नाते फार जुने आहे.

विविध खेळाडूंनी अभिनेत्री सोबत लग्न केले आहे तर काही सेलिब्रेटींनी क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. यात जुही चावला, शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यासारख्या मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत आता बॉलिवूडचा बेधडक गली बॉय अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचे नावही सहभागी होणार आहे.

विविध वृत्तांच्या मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ साली च्या आयपीएलमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएलमध्ये ८ ऐवजी एकूण १० संघाचा समावेश केला जाणार आहे.

याचाच अर्थ येत्या आयपीएलमध्ये दोन नवे आयपीएल संघ असणार आहेत. हे संघ नेमकं कोणते असतील? त्यांची नावं काय? याची स्पष्टपणे माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे दोन संघ खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित केला जाणार असून यात अनेक हस्ती सहभागी होण्याची शक्यता आहे.

आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे यादरम्यान २ नव्या आयपीएल टीमसोबत यंदा खेळाडूंचा लिलावही पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहेत. त्यामुळे जर रणवीर-दीपिका या जोडीने क्रिकेटचा संघ खरेदी केला तर ते जुही चावला, शाहरुख खान, प्रिती झिंटा यांच्या यादीत सहभागी होतील.

यामुळे रणवीर आणि दीपिका आयपीएलमध्ये एक संघ खरेदी करतात का? हा आता चर्चेचा विषय बनला आहे.अनेक कलाकार, व्यावसायिक हे क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोललं जात आहे. यात रणवीर आणि दीपिकाचेही नाव समोर येत आहे.

त्यांनी नुकतंच यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे.रणवीर सिंग माजी लोकप्रिय क्रिकेटपटू कपिल देव यांच्या बायोग्राफी वर चित्रपट काढत आहे,यावरून हे मानलं जाऊ शकतं की रणवीर ची रुची क्रिकेट मध्ये आणखी जास्त वाढली असणार,

त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा;पण याची अद्यापही रणवीर आणि दीपिका ने स्पष्टपणे माहिती दिली नाही,त्यामुळे सध्या तरी त्यांचा आयपीएल संघ घेणं हा एक रहस्य च आहे,असं म्हणावं लागेल!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.