जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डीसले यांची नियुक्ती!

0

 

महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ज्यांच्या सन्मानाने रोवला गेला असे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले सर यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक जून २०२१ ते जून २०२४ या कालावधी मध्ये ते सल्लागार म्हणून असणार आहेत. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

जगातील १२ व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. डिसले गुरुजींनी बोलताना सांगितले की २१ व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांची झालेली ही निवड अभिमानाची गोष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.