
राणेंची तर हऱ्या, नाऱ्याची गॅंग होती; मंत्री गुलाबराव पाटील यांचा सणसणीत टोला !
राजकारण म्हणले की आरोप प्रत्यारोप आलेच. अशाच आरोप प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा राणे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात रंगला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांचा वाळूचा धंदा असल्याचा आरोप केला होता.
पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले “नीलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांची तर हाऱ्या, नाऱ्याची गँग होती. याची आपल्याला माहिती आहे”, असा सणसणीत टोला शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
राणे यांनी बोलत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच बोलताना त्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाळूचा धंदा असल्याचा आरोप केला होता. या मुद्द्यावरून आक्रमक होत मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच राणे यांची पिसे काढली आहेत.