
मला कोणाचाही बाप अरेस्ट करू शकत नाही; रामदेव बाबांचा “तो” व्हिडिओ व्हायरल!
योगगुरू रामदेव बाबा यांना अटक करण्याची मागणी सगळीकडून होत आहे. अशाच मध्ये रामदेव बाबा यांच्या अजून एका व्हीडिओ ची चांगलीच चर्चा सगळीकडे होताना दिसून येत आहे. देशात कोरोनाची परिस्थिती भंयकर असताना योग गुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला होता
बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलंय.
देशात कोरोनाची परिस्थिती भंयकर असताना योग गुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. या नंतर रामदेव बाबा यांनी माघार घेतल्याचे ट्विट केले होते.
नेमके रामदेव बाबा काय म्हणाले,’कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, आमचा ट्रेंड सर्वात वरती असतो, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता., असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
आता मात्र पुढे नेमके काय होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.