राज्य सरकारचे तगडे नियोजन; मात्र स्थानिक प्रशासनाचा गलथान कारभारामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

0

अहमदनगर | पाथर्डी तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायत कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केलेलं आहे. या ठिकाणी रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे म्हणून प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले आहे. मात्र अंबलबजावणी करण्यात मात्र तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक प्रशासन हे गांभीर्याने वागताना दिसून येत नाही. या ठिकाणी नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अधिक नुकसानकारक ठरली आहे. गावातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याने तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थपने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेशन धान्य दुकान अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गावामध्ये धान्य वाटप करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक पातळीवर कसलेच नियोजन न केल्यामुळे रेशन धान्य दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली.

गावातील तरुणांनी पुढाकार घेत स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली. तसेच टाळाटाळ करत हात वरती करत जबाबदारी झटकली. राज्यात गंभीर परिस्थिती असताना जर या गोष्टी घडत असतील तर सामान्य माणसाने नेमके करावं तरी काय. एकीकडे राज्य सरकार अधिकाधिक निर्णय घेत यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र स्थानिक प्रशासन हे सुस्त आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.