मम्मी बघ पप्पांना चटके बसत आहेत’, राजीव सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; मुलीच्या या उद्गाराने सगळेच स्तब्ध

0

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या वरती हिंगोली मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगोली मधील कळमनुरी च्या मसोड या मूळगावी सातव यांना मुखाग्नी देण्यात आला. यावेळी सातव यांच्या मुलीने असे वाक्य वापरले की सर्वांचंच हद्य पिळवटून निघालं.

राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. रविवारी त्यांचं निधन झालं. त्या नंतर त्यांचं पार्थिव हिंगोली मध्ये आणण्यात आले. सोमवारी त्यांच्या मूळ गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अत्यंत भावनिक आणि हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला. सातव यांचा मुलगा पुष्कराज यानं मुखाग्नी दिल्यानंतर जेव्हा चिता पेटली त्यावेळी सातव यांच्या मुलीनं आईला घट्ट मिठी मारली. ईटिव्ही भारतच्या वृत्तानुसार, यावेळी सातव यांच्या मुलीनं ”मम्मी बघ पप्पांना चटके बसत आहेत” असं म्हणत अश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांना सुद्धा नेमकी तिची समजूत कशी काढावी हे समजले नाही. सगळ्यांनीच आपल्या डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी सगळे जणू सुन्न झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.