
आजचे वर्क फ्रॉम होम स्वर्गीय राजीव गांधी यांच्या मुळेच, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली!
भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे आधुनिकतेच्या बाबतीत योगदान फार महत्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या देशामध्ये माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून भविष्याकडे वाटचाल केली. आजच्या संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया हा स्वर्गीय राजीव गांधी यांनी रचला आहे. देशातील संगणक युगाची नांदी ही स्वर्गीय राजीव गांधी यांच्यामुळे आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले “स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे”.
स्वर्गीय राजीव गांधी यांचे कार्य हे फार मोठे आहे. त्यांनी देशाला विज्ञानाची कास धरून प्रगतीचा मार्ग दाखवला. त्यांचं अतुलनीय असे हे देशाच्या उज्वल भविष्यासाठी केलेलं कार्य उल्लेखीय आहे.