बेड साठी केली आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना विनंती !

0

महाराष्ट्रात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची सध्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धावपळ दिसून येत आहे. लोकांना इंजेक्शन मिळावेत, ऑक्सिजन मिळवा तसेच लोकांना सुविधा मिळाव्यात. त्याच बरोबर बाधित होणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हावी व मृत्यू दर हा कसा रोखता येईल या दृष्टीने आरोग्यमंत्री काम करताना दिसून येत आहेत


आरोग्य मंत्र्यांना या सगळ्या कामात व्यस्त असताना सुध्दा कोणी तरी संपर्क करतो आणि त्याची तत्काळ दखल घेत पाठपुरावा करून त्या रुग्णाला सहकार्य करण्याचे काम आरोग्य मंत्री करतात ही खूप कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्राचा भार हा गेल्या वर्षी पासून सक्षमपणे आरोग्यमंत्री राजेश टोपे वाहत आहेत. रात्रंदिवस त्यांचे अविरत काम सुरू आहे.

असेच काल एका रुग्णाला खूप धावपळ करून पण बेड मिळत नसल्याने नातेवाईकांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर स्वतः आरोग्य मंत्री यांनी संपर्क करून कुठे बेड उपलब्ध आहे याची माहिती घेतली. व माणुसकीच्या नात्याने वायसीएममधील डॉ. विनायक पाटील यांना फोन करून रुग्णाला तातडीने बेड देण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णाला तातडीने भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाला तातडीने प्लाझ्मा देखील देण्यात आला. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.