केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी 

0

कोरोना मध्ये केंद्र सरकारने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे नियोजन करण्याची गरज होती. कोणताही ठोस निर्णय न घेता केंद्र सरकार सावळा गोंधळ सुरू असल्यासारखे काम करत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक कालावधीमध्ये जितकी सक्रियता दाखवली तितकी सक्रियता कोरोना महामारी च्या वेळेस दाखवली नाही, त्यामुळे देशांमधील असंख्य लोकांचे मृत्यू झाले.

याच कोरोना महामारीच्या नियोजनावरून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकार वरती टीका करत असते. लसीकरणाच्या बाबतीत झालेला गोंधळ असेल तसेच ऑक्सिजनची कमतरता, रुग्णांना न मिळणारे बेड अशा विविध विषयावरती बोलण्याचे काम काँग्रेस करते. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी ट्विटर हँडलवरुन नेटिझन्सलाच प्रश्न विचारुन त्याचं उत्तर देखील स्वत:च देऊन टाकलं आहे. ते म्हणाले की “केंद्र सरकारमधील सर्वात कुशल मंत्रालय कोणतं?”, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि त्याच्या उत्तरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा करणारं गुप्त मंत्रालय हे केंद्राचं सर्वात कुशल मंत्रालय आहे”, असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.