राहुल गांधींनी कोरोनाच गांभिर्य ओळखत पश्चिम बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

0

देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे.कोरानाची दुसरी लाट वेगान फैलावत असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.रुग्णांना वेळेवर औषधोपचार नाहीत अस विदारक चित्र दिसू लागल आहे.काही रुग्णांचा यात दुर्दैवी मृत्यूही होत आहे.लोकसंख्येच मोठ प्रमाण असलेल्या आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कोरोना लसीकरण होत आहे.या सगळ्यातच देशात पाच राज्यात निवडणुका लागलेल्या आहेत.या निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी सभा घेत आहेत.काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या सभा ठेवलेल्या आहेत.

दरम्यान देशातील कोरोना परिस्थितीचा विचार करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द केल्या आहेत.पश्चिम बंगालमध्ये काही टप्प्यात मतदान झाल असून काही टप्पे उर्वरित आहेत.परंतु सभांना जमणारी सर्वसामान्य जनतेची गर्दी तेथे सोशल डिस्टन्सींगची होणारी पायमल्ली यांमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरू शकतो तसेच रुग्ण दगावूही शकतात असा विचार करत राहुल गांधींनी सभा रद्द केल्या आहेत.

देशात आरोप प्रत्यारोपाच राजकारण चालू असताना राहुल गांधी यांनी मात्र स्वताच्या पातळीवर जनतेच्या जीवाचा विचार केला आणि  निवडणूक प्रचार बाजूला ठेवत,राजकीय स्वार्थ टाळत सभा रद्द केल्या.राहुल गांधी यांनी कोणतेही निर्बंध येण्याची वाट न पाहता वैयक्तिक विचारातून लोकांचा जीव महत्वाचा हे सूत्र पुढे करत होऊ घातलेल्या सर्व सभा रद्द केल्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.