‘D Mart’ चे राधाकिशन दमानी यांनी मुंबईत घेतला 1000कोटींचा बंगला

0

डी मार्ट हे बझार देशभरात लोकप्रिय असून ठिकठिकाणी त्यांचे आऊटलेट आहेत.त्यांचा व्यापारही उत्तम चालतो.याच डि मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी मुंबई येथील मलबार हिल्स या उच्चभ्रू वस्तीत ‘मधुकुंज’ नावाचा तब्बल 1000 कोटींचा बंगला खरेदी केला आहे.60 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त बिल्ट अप एरिया असणारा हा बंगला दीड एकर जमिनीवर स्थित आहे.बंगल्याचे मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद यांचे कुटुंबिय असून याच प्रेमचंद राॅयचंद यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना केली होती.व त्यांच्या आईच्या नावे असलेला राधाबाई टॉवर मुंबईला भेट दिला होता.या परिसरात निवासी फ्लॅटची किंमत 70 ते 80हजार प्रति चौरस फूट आहे.राधाकिशन दमानी यांनी नुकतीच ठाण्यात अडीचशे कोटी रुपयांना आठ एकर जमीन खरेदी केली आहे.

राधाकिशन दमानी यांचा बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता.मात्र तो तोट्यात गेल्याने त्यांनी व्यवसाय बंद केला.दरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केले.अल्पावधितच यात पारंगत होत त्यांनी छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू केली 1990 मध्ये गुंतवणुकीतून त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले होते.त्यानंतर किरकोळ व्यापारात उतरत त्यांना डि मार्टची संकल्पना सुचली.सुरुवातीला अल्प मूल्य शेअर्स असलेल्या या शाॅपिंग चेनचे शेअर्स उत्तम मूल्यात आहेत.सध्या बाजारात त्यांच्या कंपनीच मूल्य 1.88 राख कोटी रुपये आहे.दमानी यांनी मध्यम वर्गीय ग्राहकाची नस ओळखत स्वताचे मार्ट सुसज्ज केले असून दर्जा व सेवा यांमुळे हे मार्ट देशातील 214 विभागात आहेत.दमानी यांनी रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक केलेली आहे.

दरम्यान दमानी यांनी मधुकुंज बंगल्याची ड्युटी (३टक्के दराने) तीस कोटी रुपये गेल्याच महिन्यात भरली आहे.हा बंगला 90 वर्षे जुना असल्याने दमानी या बंगल्याचे नूतनीकरण करण्याची शक्यता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.