इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया पडली एका गरीब भारतीय नोकराच्या प्रेमात

0

इंग्लंडने भारतावर १५० वर्षे राज्य केले. ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीत त्यांचे मॅनर्स, पोषाख, खाद्य पदार्थ यांची भर पाडली. दोन महायुद्धानंतर मात्र इंग्लंड खिळखिळी झाली आणि त्यांनी वसाहतवादी धोरण सोडल आणि भारतीय स्वातंत्र्य पुत्रांच्या प्रयत्नाला यश येऊन भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. या दरम्यान इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया एका भारतीय युवकाच्या प्रेमात पडली, कोण होता तो युवक चला जाणून घेऊया.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात राणी व्हिक्टोरिया ही एका गरीब भारतीय नोकराच्या प्रेमात पडली. त्या भारतीय व्यक्तीचे नाव अब्दुल करीम होते. अब्दुल करीम त्यावेळी २४ वर्षांचा होता. १८८७ साली अब्दुल करीमला भारताकडून राणी व्हिक्टोरियाला भेट म्हणून पाठवण्यात आले होते. कारण तो देखणा असण्यारोबरोबरच हुशार होता. एका वर्षाच्या आत त्याला इंग्लंडमध्ये राणी व्हिक्टोरियाला हिंदी व उर्दू भाषा शिकवण्यासाठी पाठविण्यात आले. इंग्लंडच्या या राणीच्या वडिलांचे निधन तिच्या जन्मानंतर ८ महिन्यातच झाले. ही राणी सुरुवातीला एकाकी राहत होती.

राणी आणि अब्दुल करीम यांची प्रेमकहाणी चित्रपटाप्रमाणे होती. अब्दुलच्या उंच आणि सुंदर व्यक्तिमत्वावर राणी भाळली होती. राणी त्याच्या प्रेमात पडली तेव्हा ती ६० वर्षांची होती. राणी व करीम १५ वर्षे एकत्र राहिले. राणीने त्याला भारताचे सचिव केले होते. या दोघांचे संबंध ब्रिटीश राजघराण्याने कधीही मान्य केले नाहीत. राणीच्या निधनानंतर १९०१ साली किंग एडवर्डने अब्दुल करीमला भारतात पाठवले. अब्दुल करीम नंतर आग्रा येथे एकटाच राहत होता. त्याचा १९०१ मध्ये ४६ वर्षी मृत्यू झाला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.