
४ हजार प्रतीचौरस मीटरची जमीन २८, ०९० दराने खरेदी; अयोध्येत घोटाळा, विरोधकांचा आरोप!
अयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आल्याने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत अशा मध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर आल्याने राजकीय नेते सुद्धा चांगलेच चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली. आता त्याच प्रकरणात एक आणखी खुलासा झाला. त्यातून चार हजार रुपये प्रतिचौरस मीटरची जमीन राम मंदिर निर्माण ट्रस्टने २८,०९० रुपये प्रतिचौरस मीटर भावाने खरेदी केली, अशी माहिती समोर येत आहे.
यामुद्द्यावरून काँग्रेस, माकप आणि समाजवादी पक्षाने केंद्र सरकार, योगी सरकार आणि भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. लोकांनी पै पैं देऊन राम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी गोळा करून दिला आहे, त्या मध्ये असा गैरव्यवहार होत असेल तर ही गंभीर बाब आहे.
काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून विचारले आहे की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाला हे सांगावे की, फक्त ७९ दिवसांत जमिनीचा भाव १२५० टक्के कसा वाढला? प्रत्यक्षात सरकारने जमिनीचा दर चार हजार रुपये प्रतिचौरस मीटर ठरवलेला आहे. मग राम मंदिर निर्माण ट्रस्टने ती २८,०९० रुपये प्रतिचौरस मीटर भावाने का विकत घेतली? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.