#मोहोळमाफीमागा पुणेकरांची मुरलीधर मोहोळांच्या ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया

0

देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून मुंबई,पुणे,विदर्भ,मराठवाडा येथील परिस्थिती गंभीर आहे.विशेषता पुण्यातील पिंपरी ,चिंचवड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.

देशात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही जोरात सुरु आहे.परंतु दोन दिवसांपूर्वी लसीची मागणी व पुरवठा यात तफावत आल्याने लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती.नागरिक संतप्त झाले होते.

दरम्यान 9 तारखेला सायंकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानले,त्यात त्यांनी पुणे जिल्हयात 2 लाख 48 हजार लस मिळाल्या असून रविवारी 1लाख 25 हजार लस मिळणार असल्याच स्पष्ट केल.

मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असल्याने माध्यमांनी त्यांच्या ट्विटची दखल घेत त्याची बातमी केली,परंतु मोहोळ यांची माहिती चुकीची असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

राज्यात पुण्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत,हे सत्य असल तरी राज्यात इतर ठिकाणीही लसीचा तुटवडा,रेमीडीसेव्हरची कमतरता,बेड उपलब्ध नसणे असे प्रश्न उभे असताना अशाप्रकारे भलावण करण चुकीच आहे अस मत नेटकर्यांनी मांडल.

पुण्यासह इतरही लसीचा पुरवठा का होत नाही असा प्रश्न मोहोळांना विचारण्यात येत आहे.तसेच पुणेकरांनी #मोहोळमाफीमागा असा हॅश टॅग सुरू केला असून त्यावर मोहोळ यांच्याविरूध्द संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.