
प्रेमाला कुठलीही बंधने नसतात तर ते मुक्त असते याची प्रचिती सर्वानाच आली आहे. एका आगळ्या वेगळ्या लग्नाने सर्वांना सुखद आणि आश्चर्याचा धक्का देत ही प्रेम विवाहाची घटना मनमाड मध्ये पाहायला मिळाली. समाजाच्या बंधनाला झुगारून देत एका प्रियकर आणि तृतीयपंथी असलेल्या प्रियेसी यांचा नातेवाईक, मित्र यांच्या उपस्थिती मध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. हा आगळावेगळा विवाह सध्या मनमाड शहर परिसरातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून या नव दाम्पत्याला दोन्ही कडील लोकांनी शुभ आशिर्वाद दिले आहे.
या दोघांच्या प्रेमाचे सुर हे सोशल मीडिया वरून मैत्रीच्या माध्यमातून जुळत गेले. नंतर त्याच्या मध्ये एकमेकांच्या बद्दल प्रेम निर्माण झालं. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी संजयने तिला प्रपोज केला तितक्याच प्रतिसादाने शिवलक्ष्मिने त्याला होकार दिला. त्यांच्या या प्रेमाचे नाते अधिकाधिक बहरत गेले. आणि संजयने तिच्या सोबत लग्न करण्याचा पणच केला की करेल लग्न तर शिवलक्ष्मी सोबतच!
कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन कसे पटवून द्यायचे हा प्रश्न होताच. मात्र व्यवस्थित समजावून सांगून या दोघांनीही घरच्यांच्याही गळी हे उतरवून लग्नास हिरवा कंदील मिळवला.
लग्न संपन्न झाल्याच्या नंतर नवरदेव संजय झाल्टे म्हणाला की “माझी सोशल मीडियावर शिवलक्ष्मीशी ओळख झाली आम्ही 2 वर्ष फ्रेंडशिप मध्ये होतो त्यानंतर मी 14 फेब्रुवारीला रीतसर प्रपोज केलं व डायरेक्ट लग्नाची मागणी घातली, तीने देखील चार चौघात लग्न करशील तरच करेल, अशी अट घातली. मी माझ्या घरच्यांना विश्वाससाथ घेऊन रीतसर मागणी घालून पारंपरिक पद्धतीने लग्न केले व आता आयुष्यभर तिच्यासोबत राहून संसार करणार आहे”!
सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. या उभयंतांच्या धाडसाचे सगळीकडेच कौतुक सुरू आहे.