नवी मुंबईतील विमानतळाला या नेत्याचे नाव देण्याचा प्रस्ताव; लवकरच होणार नावावर शिक्कामोर्तब!

0

नवी मुंबई मधील विमानतळ निर्मिती साठी मागील काही वर्षांच्या पासून प्रयत्न होताना दिसत आहेत. आता या प्रयत्नांना मूर्त स्वरूप लवकरच येणार आहे. विमातळासाठी दिलेल्या जमिनीवरून बराचसा वाद मागील काळात झालेला आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विमानतळ निर्मिती साठी १ फेब्रुवारी रोजी परवानगी देण्यात आली आहे. सोबतच शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” यांच्या नावाने सिडको कडून प्रस्ताव मागितला होता. सिडकोच्या संचालक मंडळ यांच्याकडून हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे.

राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्याच्या नंतर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. मुंबई तसेच महाराष्ट्रात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या नावाच्या घोषणेने चांगलेच जल्लोषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता दिसून येते आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.