
प्रियंकाला मिळाली ‘७४ व्या ब्रिटीश अकॅडमी चित्रपट’ पुरस्कार जाहीर करण्याची संधी.
प्रियंका चोप्राने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय करून आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.आता तिने हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक हॉलिवूड मालिका, चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. निक जोनससोबत लग्न केल्यानंतर तर ती जास्तच चर्चेत आली.तिने नुकतेच मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकनं जाहीर केली होती. आणि आता ती चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिला एका पुरस्कार सोहळ्याची नामांकनं जाहीर करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे.
प्रियंकाला ७४ व्या ब्रिटीश अकॅडमी चित्रपट पुरस्कार जाहीर करण्याची संधी प्रियांकाला मिळाली आहे. हा सोहळा १० आणि ११ एप्रिल रोजी रॉयल अल्बर्ट हॉल इथे होणार आहे. तीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून बाफ्ताच्या ऑफिशियल पेजवरची पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते कि, “हा माझा सन्मान आहे. रविवारी हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”
प्रियांका नुकतीच ‘द व्हाईट टायगर’ या नेटफ्लिक्सच्या चित्रपटात दिसली होती.विशेष म्हणजे चित्रपटाची निर्मितीही प्रियांकाने केली आहे. यावर्षीच्या बाफ्ता पुरस्कारासाठी या चित्रपटाला २ नामांकने मिळाली आहेत. प्रमुख भूमिकेसाठी आदर्श गौरव याला नामांकन आहे, तर सर्वोत्कृष्ट पुस्तकाधारित पटकथेसाठी लेखक दिग्दर्शक रमिन बहरामी यांना नामांकन मिळालं आहे.
या पुरस्कार सोहळ्यात ‘राईजिंग स्टार पुरस्कार’ प्रियंका जाहीर करणार असून हा पुरस्कार नव्या लोकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येतो. रिचर्ड ग्रांट, टॉम हिडलस्टन, फेलिसिटी जोन्स, जेम्स मेकएव्हॉय, डेव्हिड ऑयलोव्हो, पेड्रो पास्कल हे कलाकारही पुरस्कार जाहीर करणार आहेत. प्रियांका आणि लंडनमधील इतर कलाकार तसेच लॉस एंजिलीसमधीलही कलाकार व्हर्च्युअल पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होतील.