पंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा : संजय राऊत

0

आपल्या देशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मात्र देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री समोर येताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते देशातील जनतेला या समस्येतून मधून बाहेर काढताना दिसत नाहीत. आज संजय राऊत यांनी केंद्र सरकार वरती कठोर शब्दात टीका केली आहे.

शिवसेना नेते खा.संजय राऊत म्हणाले देशात पंतप्रधान आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत पण ते गायब आहेत. आपला देश रामभरोसे चालला आहे. पंतप्रधान जागेवरच आहेत; पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे त्यांनी अदृश्य होऊन चालणार नाही. याच बरोबर अहंकार बाजूला ठेवून केंद्र सरकारने महाराष्ट्र मॉडेल लागू करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गंगा आणि यमुना नद्यांमध्ये मृत व्यक्तींची प्रेते सापडत आहेत. माणसांच्या प्रेतांचा खच दिसून येत आहे यापूर्वी अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. देशात हाहाकार माजला आहे. प्रभू श्रीराम जन्मभूमी मध्ये ऑक्सिजन अभावी लोक मृत पडत आहेत हे दुर्दैवी आहे.  अहंकार विसरून देशाला या परिस्थिती मधून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. अशा आशयाचे मत खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.