दरेकारांचा दावा, यानंतर फुलणार राज्यात ‘कमळ’

0

पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे.

या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेते सातत्याने ठाकरे सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा करताना दिसत आहेत. यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा केला आहे.

‘ठाकरे सरकारकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा प्रत्येकाला किमान ५००० रुपये हे सरकार देईल, असं वाटलं होतं. परंतु, या सरकारने काहीच दिलं नाही,’ असं सांगत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तसेच, जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. त्याच जुन्याच योजना नवीन सांगून दाखवल्या, त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ही पोटनिवडणूक झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

यावेळी पवार कुटुंबावर टीका करताना, ‘पवार कुटुंब लेकराबाळांसकट पंढपुरात आहे. त्यांचा डोळा साखर कारखान्यांवर आहे. राजकारण केवळ श्रीमंतांसाठी आहे, असं म्हणत निशाणा साधला आहे.

राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.