प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

0

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिलसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर बेछूट आरोप करत असून उठसूठ भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यातूनच त्यांनी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करून वारंवार प्रसिध्दी माध्यमांसमोर भ्रष्टाचार होत असल्याची माहिती देत होते यावर प्रताप सरनाईक यांनीही कारवाई करत किरीट सोमय्या यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

प्रताप सरनाईक यांनी आपले वकिल अमित नाडकर्णी यांच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सोमय्या यांनी खोट्या माहितीच्या आधारे अपमानकारक मजकूर प्रसिद्ध केला व मानहानी केली. त्यामळे सरनाईक यांनी आपली मानहानी केल्याबाबत सोमय्या यांना नोटीस देऊन सदर प्रकरणी माफी मागण्याचा पर्याय दिला होता. अन्यथा त्यांच्या विरूध्द १०० कोटींचा दावा दाखल करू असे कळवले आहे.मात्र, सोमय्या यांनी त्यांना दिलेल्या कायदेशीर सुचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, सूडभावनेने त्रोटक जबाब उत्तरादाखल दिला. त्यामुळे सरनाईक यांनी सोमय्या यांचे विरूध्द १०० कोटीचा दिवाणी दावा दाखल केला.

तरी देखील सोमय्या यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सरनाईक यांच्या विहंग गार्डन स्किम विषयावर आयुक्तांना भेटणार असल्याचे जाहीर केेले होते. त्यानुसार त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रसार माध्यमांसमोर हजर राहून परत एकदा प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरविली आहे. सोमय्या यांनी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे व खास करून सरनाईक यांची बदनामी करणे चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांनीच फौजदारी कारवाईसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे आता सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.