प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है!

0

देशाच्या राजकारणात चाणक्य समजल्या जाणाऱ्या दोन दिग्गज व्यक्तींची ही दुसरी भेट आहे. देशाच्या राजकारणात चाणक्य म्हणून समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची आज बैठक दिल्ली येथे संपन्न होणार आहे.

शरद पवार आणि प्रश्न किशोर यांच्या मध्ये मुंबई येथे तब्बल साडे तीन तास चर्चा संपन्न झाली होती. या भेटीची चर्चा उभ्या देशात सर्वाधिक चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही तरी शिजत असून पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहत नाही.

आज शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह केरळातील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रशांत किशोर पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी भेटीला दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शरद पवारांच्या डोक्यात नेमके काय सुरू आहे याचा अजुन तरी कोणाला थांग पत्ता लागला नाही. सगळेच या भेटी मागे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. देशातील दोन मातब्बर व्यक्ती सोबत आल्याने राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेला वेग आला आहे हे मात्र निश्चित आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.